top of page

RGS Parents Group

Public·161 members

*सर्व पालकांना विनंती की आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा. नाहीतर, भविष्यात बिघडतील व नंतर ते तुम्हाला सुद्धा विचारणार नाही.*

*काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत*

*1)* त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. साधी ठेवन असावी. उगीचच वेगवेगळे कट मारू नका.

*2)* पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत. साधे असावेत.

*3)* शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका

*4)* वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या....

*5)* दादाचा मुलगा भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या.

*6)* *अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा.....*

*7)* मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका.....

*8)* मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या.

*9)* मुलगा/मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात,खरच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा.

*10)* व्यसनाधीनतेचं वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या पाल्याविषयी त्याबाबतीत सतर्क रहा.

*11)* तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या......

*12)* पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या....

*13)* शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रूपया देऊ नका .....

*14)* आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्यापेक्षा सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा....

*15)* 24 तासांपैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या....

*16)* आपली मुलं विकृत विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या... जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा.....

*17)* महीन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा....

*18)* तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवूच शकत नाहीत...

*19)* मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका...

*20)* आपल्या मुलांचा शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतो की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या...

*21)* शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्यांला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या..

22) मुलांच्या शिक्षका विषयी तक्रारी ऐकुन शिक्षकांशी विनाकारण वाद घालू नका

23) घरचे व रस्त्याने जाता येता मुलांचे होणारे वाद त्याचा शिक्षकावर ठपका ठेवू नका

२4) तुमची मुलं व ध चा म करून शिक्षकाविषयी घरच्यांना काहीतरी सांगत असतात तुमची खूप चलती आहे पन विनाकारण शिक्षकाला काही बोलू नका,भांडू नका.शिक्षक अजून शिक्षकच आहे.

25) विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांशी तुमचे जेवढे होतील तेवढे प्रेमाचे संबंध ठेवता येतील तेवढा अधिकाधिक प्रेम असू द्या. कारण मुलांना शिक्षक किंवा आईच घडू शकते लक्षात ठेवा

26) *पूर्वी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षा होती म्हणून ती पिढी सुधारली* आता शिक्षकांनी थोडे जरी काही झाले तरी पालक शिक्षकांशी वाद घालतात. व आमची खूप ओळखी आहे .आमची चलती आहे .असा शिक्षकाला दम देतात. तसे करू नका शिक्षकांना शिक्षकाचा योग्य तो मान द्या

27) तुमची मुलं सुधारतील हा शिक्षकाचा प्रामाणिक उद्देश असतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका .नाहीतर भविष्यात पस्तावा येईल

*तुम्ही वरील नियम नाही पाळले तर तुमची मुले घडणार हे निश्चित आहे वरील नियम नाही पाळले तर मुलं निश्चितच बिघडणार हे पण निश्चित आहे*

🙏🙏🙏🙏🙏

*चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक घडवूया या.....*

*आपल्या मुलांना फक्त आई किंवा शिक्षकच घडऊ शकतात हे लक्षात ठेवा*

म्हणून च वरील सुचना पाळू या....👍

🌈 *स्कूल चले* हम.................*

--------------📚🖥️📚-------------

Members

Group Page: Groups_SingleGroup
bottom of page